उन्हाची भीषण दाहकता अन् पाण्यानं बेहाल, १५ ते १७ दिवसांनी होतोय पाणी पुरवठा

| Updated on: Apr 22, 2023 | 8:21 AM

VIDEO | मनमाडच्या वागदर्डी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट, १५ ते १७ दिवसांनी होतोय पाणी पुरवठा; काय आहे कारण?

नाशिक : वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे धरणात अवघा 25 दशलक्ष पाणीसाठा शिल्लक असल्याने शहराला आता 15 ते 17 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्याचे दिवस 22 दिवसांवर जात असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा समना करावा लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रसंगी पाणी विकत घ्यावे लागत असून फेब्रुवारी महिन्यात पालखेड डाव्या कालव्यातून देण्यात आलेले आवर्तन पूर्ण क्षमतेने देण्यात आले नाही. आहे ते पाणी ऑगस्ट अखेर पुरविण्याचे संकेत शासनाने पालिकेला दिल्याने आता पाणी टंचाईचे दिवस वाढविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मे महिन्याअखेर आवर्तन अपेक्षित आहे. आवर्तन न मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईच्या झळा मनमाडकरांना सोसाव्या लागणार असून प्रशासनाने तातडीने मनमाडला पाण्याचे आवर्तन सोडण्याचे मागणी होत आहे.

Published on: Apr 22, 2023 08:21 AM
‘त्यांच्यात दम नाही ते फक्त सुके दम देतात’, गुलाबराव पाटील यांच्यावर कुणी केला हल्लाबोल?
Special Report | कोण संजय राऊत? अजित पवार यांनी थेट इग्नोरच केलं; पण का? काय घडतंय ‘मविआ’तील दोन नेत्यांमध्ये?