अमरावतीकरांनो…तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन दिवशी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद!

| Updated on: Sep 05, 2023 | 8:41 AM

VIDEO | अमरावती आणि बडनेरा शहराला केला जाणारा पाणी पुरवठा आज मंगळवार आणि उद्या बुधवार असे दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नव्या पाण्याच्या टाकीवरील कामकाजामुळे दोन दिवस पाणी राहणार बंद

अमरावती, ५ सप्टेंबर २०२३ | अमरवतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमरावती आणि बडनेरा शहराला केला जाणारा पाणी पुरवठा आज मंगळवार आणि उद्या बुधवार असे दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भीमटेकडी येथे उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाकीवरील कामकाजामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान अमरावतीत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणे, ही आता नित्याचीच बाब झाली आहे. कधी वीज पुरवठ्याचे मेन्टेनन्स करण्यासाठी तर कधी जलवाहिनीमध्ये निर्माण झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. दरम्यान अमरावती आणि बडनेरा या शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडू करण्यात आलं आहे.

Published on: Sep 05, 2023 08:41 AM
मनोज जरांगे पाटील यांनी दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला, Saamana Editorial मधून सरकारवर हल्लाबोल
मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतरही निम्म्याच नौका समुद्रात, काय आहे कारण?