मुंबईकरांनो… तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ भागात आज 14 तास पाणी राहणार बंद

| Updated on: May 28, 2024 | 12:01 PM

नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व विभागस्तरावरील पाणी पुरवठा दुरुस्ती विषयक मान्सुनपुर्व काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा 14 तास बंद असणार आहे.

मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईमध्ये आज तब्बल 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आज सकाळी 10.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व विभागस्तरावरील पाणी पुरवठा दुरुस्ती विषयक मान्सुनपुर्व काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा 14 तास बंद असणार आहे. भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरूस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तर बुधवार उद्या 29/05/2024 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असेही नवी मुंबई महानगर पालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

Published on: May 28, 2024 12:01 PM
छगन भुजबळांचं जागांसाठीचं बळ नेमकं कुणासाठी? लोकसभा निकालाआधीच विधानसभेच्या जागांचा वाद
रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम नाही, ‘या’ तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार