Ambernath Rain | अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रस्त्यावर साचलं पाणी, वाहनचालकांचा पाण्यातून प्रवास

| Updated on: Jul 19, 2021 | 3:01 PM

बदलापूर शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.

बदलापूर शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उल्हास नदी ही पुणे आणि रायगड जिल्ह्यातून वाहत येऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. कर्जतहून बदलापूर आणि पुढे कल्याणकडे ही नदी वाहत जाते. कालपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बदलापूरची उल्हास नदी चौपाटी सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही नसून उल्हास नदीला जर पूर आला, तर बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.

 

Mumbai Rain Update | ठाणे, मुलुंडमध्ये मुसळधार पाऊस, रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत
Dahisar River | नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहीसर नदीला पूर