आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही इथे – बंडखोर आमदार

| Updated on: Jun 29, 2022 | 12:18 PM

आम्ही स्व इच्छेने इथे आलेलो आहोत. गेल्या दोन अडीच वर्षात आम्ही जे भोगलंय त्यामुळे आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही इथे गुवाहाटीला आलेलो आहोत.

मुंबईः आम्ही स्व इच्छेने इथे आलेलो आहोत. गेल्या दोन अडीच वर्षात आम्ही जे भोगलंय त्यामुळे आणि बाळासाहेबांचा (Balasaheb Thackrey) विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही इथे गुवाहाटीला आलेलो आहोत. आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे आहोत. असं वक्तव्य बंडखोर आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalavi) यांनी केलंय. काही बंडखोर आमदार (Rebel MLA) आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं त्याला प्रत्युत्तर देताना कोण संपर्कात आहे त्यांची नावे सांगा असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता मात्र गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटातील काही आमदारच मी स्वतःच्या मर्जीने गुवाहाटीला आल्याचं व्हिडीओ मार्फत सांगताना दिसून येतायत.

Published on: Jun 29, 2022 12:18 PM
कृपया महाराष्ट्रातील जनतेनं गैरसमज करून घेऊ नये – बंडखोर आमदार
Gulabrao Patil: गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच थेट उत्तर, ‘त्यांनी वर्षा सोडलं, सगळं सोडलं पण शरद पवारांना काही सोडत नाहीत’