आम्ही काँग्रेसचे आणि काँग्रेससोबतच राहणार, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास
VIDEO | संवाद मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आम्ही काँग्रेसचेच म्हणत व्यक्त केला विश्वास
अहमदनगर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे आज संवाद मेळाव्यात हजर झाले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यापूर्वी त्यांची कन्या जयश्री थोरांत यांनी टिव्ही ९ ला प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला जखम झाल्यानंतर कुटुंबीयांनी संयम ठेवला. यावेळी मोठी राजकीय घडामोड झाली. यावर बोलताना जयश्री म्हणाल्या, ‘बाळासाहेब थोरात यांचा स्वभाव हा सर्वाना धरून चालण्याचा आहे. मला एक कार्यकर्ता म्हणून असे वाटते की, ते राजकीय क्षेत्रात नेहमी सक्रीय असतात आणि आता ते बरे होऊन पुन्हा जनतेत सक्रीय व्हावे, ही एकच इच्छा आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चा सुरू आहेत. मात्र थोरात परिवार हा काँग्रेससोबतच राहणार आणि थोरात परिवाराला शंभर वर्षांचा इतिहास आहे’, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
Published on: Feb 13, 2023 07:06 PM