दोन महिन्यात 700 निर्णय, शेतकरी, कामगारांवर फोकस; मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले?
शिक्षण, हेल्थ, पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं.
मुंबई: आमचं सरकार येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यात आम्ही 700 निर्णय घेतले आहेत. हे सांगताना मला आनंद होतोय. त्यात समाजातील प्रत्येक वर्गाला सामील केलं आहे. शेतकरी (farmer), कामगार आदी वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिक्षण, हेल्थ (health), पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknatth shinde) यांनी केलं. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
Published on: Sep 16, 2022 01:59 PM