आम्ही Rashmi Thackeray यांच्या पाठीशी, मंत्री Yashomati Thakur यांच मोठं वक्तव्य

आम्ही Rashmi Thackeray यांच्या पाठीशी, मंत्री Yashomati Thakur यांच मोठं वक्तव्य

| Updated on: Feb 21, 2022 | 11:03 PM

महिला काँग्रेसच्यावतीने (Congress) आज पुण्यात आयोजिलेल्या ‘लडकी हूं, लड सकती हूं” या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य आपले चौथे सुधारित आणि अद्ययावत महिला धोरण लवकरच जाहीर करणार आहे.

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र आणि राज्यात जणू सासू-सुनेचे भाडण रोज सुरू आहे. केंद्रातील लोकशाही विरोधी भाजपप्रणीत सरकारने देशभरात माजलेली अनागोंदी, अस्थिरता, महागाई याविरोधात संघर्ष करायचा आहे. आणि हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती महिलांमध्ये आहे. संसाराचा गाडा ओढत असताना महिला समाज घडवत असतात, त्याच महिला आता देश घडल्याशिवाय राहणार नाहीत. ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पुण्यात व्यक्त केला. महिला काँग्रेसच्यावतीने (Congress) आज पुण्यात आयोजिलेल्या ‘लडकी हूं, लड सकती हूं” या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य आपले चौथे सुधारित आणि अद्ययावत महिला धोरण लवकरच जाहीर करणार आहे. ज्या वेळेला महिला धोरण तयार झालं त्यासाठी सोनियाजींनी खूप मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात पाहिले महिला धोरण सादर झाले होते, असे उद्गार यावेळी ठाकूर यांनी काढले.

नारायण राणेंचे बंगले रडारवर, अधिकाऱ्यांकडून पाहणी
नाशिक महानगरपालिकेसाठी फडणवीस मैदानात