आम्ही अतिशय सौम्य भाषा वापरली, आम्हाला कुणी मराठी शिकवू नये -Sanjay Raut
महाराष्ट्रात समजा एखादा पक्षाच्या नावाखाली महाराष्ट्राची बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेलतर त्याची आरती करावी असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी असा सल्ला संजय राऊत यांनी टीकाकारांना दिला आहे.
महाराष्ट्रात समजा एखादा पक्षाच्या नावाखाली महाराष्ट्राची बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेलतर त्याची आरती करावी असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी असा सल्ला संजय राऊत यांनी टीकाकारांना दिला आहे. तसेच महाराष्ट्रातल्या लोकांना कुणीही मराठी शिकवू नये असंही ते म्हणाले आहेत. चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल तर नक्कीचं लोकशाहीत त्याचं स्वागत व्हायला हवं. पण काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजलेला दिसत नाही असं वाटतंय ऐवढं बोलून त्यांनी देशातल्या अनेक नेत्यांना चिमटा काढला.