बैलगाडा शर्यत देशपातळीवर जावी हीच आमची इच्छा : Amol Kolhe
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती (Bullock cart race)पार पडल्या. त्यानंतर आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीची बारी भरवण्यात आली होती. यामध्ये एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती (Bullock cart race)पार पडल्या. त्यानंतर आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीची बारी भरवण्यात आली होती. यामध्ये एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. इतकच नव्हे तर बैलगाडा शर्यतीवरुन शिरून मतदार संघातून विरोधक शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील( ShivSena leader Shivajirao Adhalrao Patil)यांच्या आव्हानालाही चोख उत्तर दिले आहे. यातूनच शिरूर मतदार संघात बैलगाडा शर्यतींवरून राजकीय वाद रंगल्याचे चित्र दिसून आले आहे. यापूर्वी शिवसेने नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लांडेवाडी येथे भव्य अशी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती.