Sanjay Raut : ‘एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय’; मविआला किती जागा? थेट आकडा सांगत राऊतांचा दावा
मतदानानंतर राज्यभरात विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. यामध्ये महायुतीला बहुमत मिळणार असून राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. तर संजय राऊत यांनी महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राज्यभरात विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. यामध्ये महायुतीला बहुमत मिळणार असून राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, हरियाणात काय झालं? उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला केवळ 5 जागा मिळतील असे भाकीत वर्तवले होते. त्यांनी 40 जागा जिंकल्या. मोदींना 400 जागा मिळणार, बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला आम्हाला 10 पण जागा मिळणार नाही, असा दावा करण्यात आला होता. आम्ही 31 जागा जिंकलो. या सर्वेची ऐशी की तैशी, असे वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार यांनी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजावरून जोरदार हल्लाबोल केला. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीतील सर्व जण एकत्र बसलो. महाराष्ट्रातील निवडणुका, मतदान, कौल सर्वांचा अंदाज घेतला. अनिल देसाई, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील यांच्यासह सर्व नेते मंडळी एकत्र आलो. प्रत्येक जागाचं गणित मांडल्यानंतर असं लक्षात आलं की, आम्ही 160 जागांवर सहज निवडून येऊ असं स्पष्ट झालं, असा दावा त्यांनी केला. हे सर्व्हे आणि एक्झिट पोल कोणी केले? असा सवाल करत यावर आमचा विश्वास नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यासोबतच आम्ही 26 नोव्हेंबरला सरकार बनवणार आहोत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.