VIDEO | शिवसेनेच्या या नेत्यांना कोण आवरणार? बीडचा पदाधिकारी म्हणतो, राणेच्या दोन्ही मुलांना मारणारच

| Updated on: Aug 29, 2021 | 12:02 AM

उद्धव ठाकरेंबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल, तर आम्ही सहन करणार नाही, येत्या काळात नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारणार असल्याची मुक्ताफळे, बीडचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी उधळली आहेत.

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल, तर आम्ही सहन करणारे शिवसैनिक नाहीत. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारणार असल्याची मुक्ताफळे, बीडचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी उधळली आहेत. (We will hit Narayan Rane’s son, Shiv Sena sub-district presidents warning)

शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना गणेश वरेकर म्हणाले की, नारायण राणेसोबत, कोंबडीचोरासोबत आपला वाद सुरु आहे. उद्धव साहेबांबद्दल कोणीही काहीही बोललेलं सहन करणारे आम्ही सैनिक नाही. सगळे युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख केवळ पैसे कमावण्याच्या मागे आहेत. मात्र आम्ही शांत बसणारे नाही. आमच्यात दम आहे, मी इथे सर्वांसमोर सांगतो, नारायण राणेच्या पोरांना मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फक्त सगळे जिल्हा प्रमुख आमच्यासोबत द्या. आम्ही करतो सगळं, काय करायचं ते आम्ही करतो. आमची तयारी आहे. नारायण राणेसोबत लढायची तयारी आहे. साहेब आमचं दैवत आहेत. आमच्या दैवताला कोणी काही बोललेलं आम्हाला सहन होणार नाही.

उद्धवजींवर टीका झाली तर आम्ही शांत बसणार नाही : वैभव नाईक

अ‍ॅक्शन झाल्यास रिअ‍ॅक्शन होणारच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. सध्या नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली कोकणात भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना आणि भाजपमधील राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे भाजप पक्षही तितकाच आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का? असा सवाल करीत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. तसंच ‘हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं’, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.

राणेंच्या घराबाहेर पोलिसांच्या काठ्या खाणारा शिवसैनिक मोहसीन शेखला बढती!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. त्यावेळी भाजप आणि युवासेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आहे. तेव्हा युवासेनेचा पदाधिकारी असलेल्या मोहसीन शेखला पोलिसांच्या लाठ्यांचा चांगलाच प्रसाद मिळाला होता. त्यानंतर आता युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोहसीनला मोठं बक्षीस दिलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बढतीनंतर ‘मी पद मिळवण्यासाठी आंदोलन केलं नाही तर आमचं दैवत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत राणेंच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केल्याचं’ मोहसीनने म्हटलंय.

इतर बातम्या

भान ठेवून बोललं तर असे प्रसंगच येणार नाहीत, राणेंच्या अटकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांच्या शोधात नाशिक पोलीस; राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला

(We will hit Narayan Rane’s son, Shiv Sena sub-district presidents warning)

Published on: Aug 28, 2021 10:02 PM
Special Report | भविष्यात भाजप-शिवसेना युतीसाठी जागा कायम आहे का?
Special Report | भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची जोरदार टोलेबाजी