Breaking |…अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करण्यास विरोध करु, विश्व हिंदू परिषदेचा इशारा

| Updated on: Jul 15, 2021 | 10:24 AM

जर दिंडीला परवानगी दिली नाही तर येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाऊन महापूजा करु देणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.

अहमदनगरला आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायाला दिंडीने पंढरपूरला जाण्यास परवानगी न दिल्याने आता विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे. सरकारने मोजक्या वारकऱ्यांना दिंडीने जाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. जर दिंडीला परवानगी दिली नाही तर येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाऊन महापूजा करु देणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. एकीकडे हॉटेल, मॉल, दारुचे दुकान यांना परवानगी देतात, मग वारकऱ्यांना दिंडीने जायला परवानगी का देत नाही असा सवालही विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. इतकेच नाही तर येत्या 17 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक दिंडी काढून सरकारचा निषेध देखील करणार विश्व हिंदू परिषद करणार आहे.
Corona Update | देशभरात काय घडतंय?
महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली काय?, राऊतांचा घणाघात