Pankaja Munde | लोकांच्या आग्रहामुळे यंदाचा दसरा मेळावा कोरोना नियम पाळून होणारच : पंकजा मुंडे
माझ्यासमोर अनेक लोकांनी तसं बोलून दाखवलं आहे. यामुळे या वर्षी भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे. सर्व कोरोना नियम पाळून हा दसरा मेळावा आम्ही आयोजित करणार आहोत, अस भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड : सध्या सर्व मंदिरं सुरु झालेले आहेत. संपूर्ण राज्यातून भाविकांना यंदाच्या दसरा मेळाव्यात यायचं आहे. सर्व भगवान बाबा भक्तांची तशी इच्छा आहे. माझ्यासमोर अनेक लोकांनी तसं बोलून दाखवलं आहे. यामुळे या वर्षी भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे. सर्व कोरोना नियम पाळून हा दसरा मेळावा आम्ही आयोजित करणार आहोत, अस भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.