कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’; मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’

| Updated on: Jul 12, 2021 | 9:57 AM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे.

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत आज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केला आहे. (Red Alert for Konkan Maharashtra for next five days ‘Orange Alert’ in Mumbai)

रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
Mumbai Vaccination | मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर आज पुन्हा गोंधळ