Sangli : कापूसखेड गावात पहिल्या महिला फौजीचं जल्लोषात स्वागत
सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावची कन्या स्रेहल कृष्णा खराडे (Snehal Kharade) हिची बिहार येथे सशस्त्र सीमा बल (एस. एस. बी) दलात निवड झाली आहे. राजस्थान (Rajasthan) येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथमच गावात आली.
सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावची कन्या स्रेहल कृष्णा खराडे (Snehal Kharade) हिची बिहार येथे सशस्त्र सीमा बल (SSB) दलात निवड झाली आहे. राजस्थान (Rajasthan) येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथमच गावात आल्यानंतर तीची गावातून मिरवणूक काढत उत्साही स्वागत करण्यात आले. कापूसखेड तसेच परिसरातून पहिली महिला फौजी होण्याचा मान तिने मिळवला आहे. वडील शेतकरी कृष्णा खराडे तर आई संगिता खराडे गृहिणी, घरची परिस्थिती बेताची. अशा परिस्थीतही तिने आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलीने सैन्यात भरती व्हावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्याप्रमाणे स्रेहल हिने खडतर परिश्रम घेतले. सैन्य दलात जागा निघाल्यानंतर तिने फॉर्म भरला. गावातील मैदानावर तसेच इस्लामपूर येथे तिने सराव केला. तीन महिन्यापूर्वी तिला प्रशिक्षणासाठी पत्र आले होते. यानुसार ती राजस्थान येथे प्रशिक्षणासाठी दाखल झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती प्रथमच कापूसखेड येथे आली होती. यावेळी ग्रामस्थांनी तिची मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला.तर आई वडिलांनी कष्टातून मला मोठे केले आहे. त्यांच्या पुण्याईमुळे मला आज देशसेवा करता येणार असल्याचे स्नेहल खराडे यावेळी म्हणाली.
Published on: Apr 04, 2022 04:36 PM