ममता बॅनर्जी मुंबईत येताच उद्धव ठाकरेंना भेटले अन् केलं कौतुक, म्हणाले, ‘…वाघासारखे लढले’
अनंत अंबानी यांच्या मुंबईतील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. ममता बॅनर्जी मुंबईत येताच त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या मुंबईतील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. ममता बॅनर्जी मुंबईत येताच त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ वर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुकही केल्याचे पाहायला मिळाले. उध्दव ठाकरे यांनी खूप चांगले केले ते वाघासारखे लढले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. मी मुंबईत येते तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटते. शरद पवार हे तर ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकी आहेत. या विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं.