Ayodhya Ram Mandir | अयोध्येच्या मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या

| Updated on: Jan 20, 2024 | 10:18 AM

रामाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वीच रामल्लांची मूर्ती नुकतीच मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली होती. त्यानंतर रामलल्ला यांच्या मूर्तीचा फोटो समोर आला होता. यानंतर या मूर्तीची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. तुम्हाला माहिती आहे का? काय आहे या मूर्तीची वैशिष्ट्ये....

Follow us on

अयोध्या, १९ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होत आहे. या दिवशी अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. रामाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वीच रामल्लांची मूर्ती नुकतीच मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली होती. त्यानंतर रामलल्ला यांच्या मूर्तीचा फोटो समोर आला होता. यानंतर या मूर्तीची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. तुम्हाला माहिती आहे का? काय आहे या मूर्तीची वैशिष्ट्ये….चला तर मग जाणून घेऊया… मैसूरचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी रामलल्लांची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती 51 इंचाची आहे. या मूर्तीला कालच (18 जानेवारी) सकाळी मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आलं होतं. कमळच्या फुलात विराजमान झाल्यानंतर या मूर्तीची उंची ही 8 फूट इतकी होते. या मूर्तीचं वजन 200 ते 250 किलोग्रामच्या आसपास आहे. रामलल्लांच्या या मूर्तीला काळ्या पाषाणातून साकारण्यात आलं आहे.