Chhagan Bhujbal यांचं तेलगी प्रकरण, 20 वर्षानंतरची खंत आणि वाद; नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Aug 28, 2023 | 10:31 PM

VIDEO | बीडच्या सभेत नेमकं काय घडलं? तेलगी प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते? 20 वर्षानंतरची खंत आणि वाद; नेमकं प्रकरण काय?

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ | मंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल २० वर्षांनंतर तेलगी प्रकरणावर भाष्य केले. या प्रकरणात माझा राजीनामा का घेतला, असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला. मात्र याआधी छगन भुजबळ यांनी याच प्रकरणावरून कोणावर टीका केली होती? बीडच्या सभेत नेमकं काय घडलं? काल सभेच अचानक गोंधळ का उडाला? छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका करताना तेलगीपासूनची प्रकरणं काढली. भुजबळ बोलत असतानाच समोर गोंधळ सुरु झाला. हा गोंधळ पवारांवरच्या टीकेमुळे होत असल्याची चर्चा झाली. मात्र हे सारं जेव्हा सुरु होतं तेव्हा भुजबळ काय बोलले, ते आपल्याला ऐकूच आलं नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. एकीकडे भुजबळ अप्रत्यक्षपणे म्हणतायत की, शरद पवार अजित पवारांवर टीका करत नाहीत. दुसरीकडे अजित पवार भुजबळांच्या आरोपांवरुन शरद पवारांवर बोलत नाहीत, हा संभ्रम आहे, की संभ्रम पसरवला जातोय, हे कोडं बनलंय. भुजबळ तेलगीवरुन काय म्हणाले, त्याआधी तेलगी प्रकरण काय होतं… बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 28, 2023 10:25 PM