काँग्रेसमध्ये काही अलबेल नाही? अंतर्गत राजकारणावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
सत्यजित तांबे यांच्या आरोपाबाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? बघा व्हिडिओ
सातारा : एकीकडे काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभिनयान सुरू आहे तर सत्यजित तांबे यांनी काँग्रेस कमिटीवर गंभीर आरोप केले आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. काँग्रेसमध्ये भरपूर लोकशाही आहे, हीच अडचण आहे. शिस्त पाळली पाहिजे. काही झाले तर चर्चा केली पाहिजे, तर सत्यजित तांबे यांच्या आरोपाबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी योग्य स्तरावर होईल, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांचे कॉग्रेस अंतर्गत राजकारणावर केले आहे. ते कराड येथे बोलत होते.सातारा जिल्हा कॉग्रेसच्या समितीच्यावतीने कराडमध्ये हाथ से हाथ जोडो अभियान प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ऍड. उदयसिंह पाटील – उंडाळकर उपस्थित होते.
Published on: Feb 06, 2023 08:42 AM