त्यामध्ये मीही आलो… राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले अजित पवार?
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. अजित पवार माध्यमांच्या प्रतिनिधींशी मिश्कीलपणे बोलत असताना नेमकं काय म्हणाले?
सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्रीपद हवं असतं, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. तर सगळ्यांमध्ये मी देखील आलोच, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्रीपदासाठी मॅजिक फिगरचा आकडा गाठावा लागतो, असे अजित पवार यांनी म्हटल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे जनता जनार्दन ठरवेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार हे पत्रकांवर खोचकपणे बोसल काहिसे भडकले. ‘सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्रीपद हवं असतं. सगळ्यांना वेगवेगळं मत असतं. जागा एकच असते. त्यासाठी तुम्हाला १४५ मॅजिक फिगरचा आकडा गाठावा लागतो. लोकशाही, संविधान यानुसार जनता निर्णय घेते. त्यामुळे सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल असं नाही.’, असे अजित पवार म्हणाले.तर पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच का असा सवाल एकनाथ शिंदे यांना केला असता काय म्हणाले ते बघा व्हिडीओ