ईव्हीएम मशीनबद्दल सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं, निकाल ठेवला राखून
यंदा मतांची व्हीव्हीपॅटद्वारे पडताळणी किंवा ईव्हीएमद्वारे मतपत्रिकांवर निवडणुका होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला त्यामुळे पुढील फैसला येईपर्यंत काही अवधी लागणार आहे. ईव्हीएम मशीनबद्दल सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं?, पाहा स्पेशल रिपोर्ट
ईव्हीएम मशीन संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला. बऱ्याच वेळा यावर सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने बऱ्याचदा याचिकाकर्त्यांचे कान टोचले. यंदा मतांची व्हीव्हीपॅटद्वारे पडताळणी किंवा ईव्हीएमद्वारे मतपत्रिकांवर निवडणुका होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला त्यामुळे पुढील फैसला येईपर्यंत काही अवधी लागणार आहे. कोर्टापुढे दोन याचिका होत्या. ईव्हीएमला जोडलेल्या व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी केली जावी, अशी एक याचिका आणि दुसरी म्हणजे, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर मतदारांचं मतदान घेतलं जावं. सध्या एका मतदाससंघात फक्त ५ ईव्हीएम मशीनच्या मतांची व्हीव्हीपॅटद्वारे पडताळणी होतेय. मात्र सर्वच ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅटशी पडताळले जावेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती. मात्र ईव्हीएम मशीनबद्दल सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं?, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…