मंत्रिमंडळ बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित झाल आहे. मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. यापुढे असंच सहकार्य राहू द्या, असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित झाल आहे. मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे. त्यावर शिंदेंनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही शिंदेंनी केला आहे.
Published on: Jun 22, 2022 03:56 PM