Maratha Reservation : मराठवाड्यात किती मराठ्यांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र? जरांगेंच्या शिष्टमंडळानं सांगितला आकडा
मराठा आरक्षणचा तिढा सुटणार? शिंदे समितीची महत्त्वाची एक बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील काही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर हे शिष्टमंडळ थेट छत्रपती संभाजीनगर येथे जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेत.
छत्रपती संभाजीनगर, ६ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे समितीची महत्त्वाची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील काही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर ते थेट छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंबईत झालेल्या बैठकीतील मुद्दे जाणून घेतले. या बैठकीत कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यात आले. हे देताना नेमका कशाचा आधार देण्यात येत आहे. याचा अभ्यास करून कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी किती, मराठा कुणबी किती हे लक्षात येणार आहे. कुणबी नोंदी आढळल्यानंतर मराठ्यांना मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात ७० टक्के कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळू शकते असे रविंद्र बनसोड यांनी म्हटले.