Mumbai Local | मुंबई लोकल आणि राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाहीट, असं फडणवीसांनी म्हटलंय.
भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ‘कृष्णकुंज’वर जात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात महाविकास आघाडीला भाजप आणि मनसे युतीचा पर्याय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पाटील आणि ठाकरे भेटीनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. ‘राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक इतकाच आहे, त्यांची परप्रांतियांशी जी भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही, असं फडणवीसांनी म्हटलंय. (What exactly did Devendra Fadnavis say about Mumbai Local and Raj Thackeray)
Published on: Aug 06, 2021 05:31 PM