Nawab Malik | क्रूझ पार्टी प्रकरणी मनिष भानुशालींवर नवाब मालिक यांनी नेमके कोणते आरोप केले ?
मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती हा मनिष भानुशाली आहे आणि तो भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप मलिकांनी केलाय.
मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती हा मनिष भानुशाली आहे आणि तो भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर मनिष भानुशाली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्याचंही मलिक यांनी म्हटलंय. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्यात प्रोफाईलवर भाजप उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्यामुळे एनसीबीनं सांगावं की त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी एनसीबीला विचारला आहे.