सुनील प्रभू यांच्यावर सुनावणीदरम्यान साक्ष बदलण्याची वेळ! शिंदे यांच्या वकिलांनी काय केले सवाल?

| Updated on: Nov 30, 2023 | 11:53 AM

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची सलग तीन दिवस उलट तपासणी होणार. या तपासणीची बुधवारी दुसरा दिवस होता. तर पाच दिवस सलग ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीत २१ जून २०२२ च्या व्हीपवरून प्रभूंना केले उलट सवाल

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची सलग तीन दिवस उलट तपासणी होणार आहे. या तपासणीची बुधवारी दुसरा दिवस होता. तर पाच दिवस सलग ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीत २१ जून २०२२ च्या व्हीपवरून प्रभूंना उलट सवाल केले जाताय. शिंदेचे वकील जेठमलानी यांनी प्रभू यांना सवाल केला की, प्रतिज्ञा पत्रात ५० व्या परीच्छेदात जे पत्र तुम्ही जोडले त्यावर तुमचीच सही आहे का? तर यावर ते होय म्हणाले. पुढे वकीलांनी असही विचारले हे पत्र तुम्ही एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलंय का आणि त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत समजावून सांगितला आहे का? यावरही त्यांनी होय असे उत्तर दिले. बघा नेमके काय काय सवाल महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना केलेत? यावर प्रभू यांनी काय काय उत्तरं दिली आहेत.

Published on: Nov 30, 2023 11:53 AM
एकीकडे राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये छगन भुजबळ यांच्यावरून चर्चा अन् दिली तंबी?
…तेव्हा तुम्ही झोपले होते, भाजपच्या बड्या नेत्यानं मराठा आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावलं