मोदींची गॅरंटी म्हणजे काय… देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ

| Updated on: Mar 01, 2024 | 6:51 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा प्रचार असेल किंवा जाहीरातबाजी असेल यामध्ये फक्त मोदी आणि गॅरंटी असे दोनच शब्द आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना ‘टीव्ही 9 मराठी’च्या लोकसभेचा महासंग्राम कार्यक्रमात सवाल केला असताना ते म्हणाले, मोदी आणि गॅरंटी म्हणजे....

मुंबई, १ मार्च २०२४ : २०१४ साली मोदी सरकार आलं तेव्हा आप की बार मोदी सरकार हा नारा होता. त्यानंतर २०१९ साली फिर एक बार मोदी सरकार आणि आता अब की बार ४०० पार असा नारा आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा प्रचार असेल किंवा जाहीरातबाजी असेल यामध्ये फक्त मोदी आणि गॅरंटी असे दोनच शब्द आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना ‘टीव्ही 9 मराठी’च्या लोकसभेचा महासंग्राम कार्यक्रमात सवाल केला असताना ते म्हणाले, मोदी आणि गॅरंटी हे दोन शब्द सारखेच आहे. मोदी म्हणजेच गॅरंटी आहे. गॅरंटी या शब्दासमोर मोदी शब्द लागतो तेव्हा गॅरंटीची गॅरंटी वाटते. मोदींनी जे अशक्य ते शक्य करून दाखवलं. मोदींनी ३७० कलम लागू केलं. रक्ताचा एक थेंबही सांडला नाही. मंदिर बनवलं. प्राणप्रतिष्ठापना झाली. मोदींनी गरीबांपर्यंत योजना पोहोचवल्या. आम्ही काय करणार आहोत हे सांगायची गरज नाही. विश्वासाला पर्यायवाची शब्द मोदी झाले आहेत किंवा मोदी गॅरंटी आहे, असे म्हटले तर मोदी आणि मोदी गॅरंटी या दोन गॅरंटीवर ४०० पार होणार आहोत. हे शंभर टक्के आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Mar 01, 2024 06:51 PM
मनसेला महायुतीमध्ये सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिले सूर मेरा… काय दिले संकेत?
अशोक चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? त्याने किती फायदा? फडणवीस थेटच म्हणाले….