काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते आणि ओबीसी नेते; विजय वडेट्टीवार यांची नेमकी भुमिका काय? एकाच आठवड्यात तिनदा यु-टर्न
जालन्यातील अंबडच्या ओबीसी सभेत वडेट्टीवार यांनी भाषण केलं. यावेळी भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही म्हणत ते दूर झालेत. तर पुन्हा भुजबळ यांचा फोन आल्याने आपण सभेला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले अन् चर्चेंना उधाण
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते आणि ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या विजय वडेट्टीवारांची तिन्ही पदांवरून चांगलीच कसरत होत असल्याची चर्चा आहे. कारण ओबीसींच्या पहिल्या सभेनंतर वडेट्टीवार यांनी स्वतःला दूर केलं होतं. मात्र आता त्यांची भूमिका पुन्हा बदलली आहे. एकाच आठवड्यात त्यांनी तिसऱ्यांदा युटर्न घेतलाय. तर काँग्रेसची भूमिका काय? हा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय. एकीकडे नाना पटोले म्हणताय, राज्यात भाजप ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचं काम करतंय. तर दुसरीकडे त्यांचेच नेते विजय वडेट्टीवार वेगळीच भूमिका घेताना दिसताय. जालन्यातील अंबडच्या ओबीसी सभेत वडेट्टीवार यांनी भाषण केलं. यावेळी भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही म्हणत ते दूर झालेत. तर पुन्हा भुजबळ यांचा फोन आल्याने आपण सभेला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका काय? यावरून चर्चा होतेय