‘विरोधकांच्या पोटात आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ’, मुख्यमंत्र्यांची सभा रेकॉर्डब्रेक होणार, शिवसेना नेत्यांचा विश्वास

| Updated on: Mar 19, 2023 | 2:56 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा, गोळीबार मैदानातून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला काय देणार प्रत्युत्तर?

रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेडमध्ये गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या त्याच मैदानावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान यासभेच्या पूर्वी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सभा स्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान, आज होणारी एकनाथ शिंदे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार, असा विश्वासही शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या भव्य जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर सभेची चांगलीच वातावरण निर्मिती शिवसेनेतून करण्यात आली आहे. सभेच्या मार्गावर आणि गोळीबार मैदानात मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. विरोधकांच्या पोटात नुसती आग, कारण मैदानात उतरला ढाण्या वाघ, करारा जवाब मिलेगा… अशा आशयाची बॅनरबाजी शिवसेनेकडून या भव्य सभेच्या पूर्वी करण्यात आली आहे.

Published on: Mar 19, 2023 02:45 PM
Old Pension Scheme : संपकरी कर्मचाऱ्यांवरील ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाड यांच्याकडून घुमजाव
गद्दार माणूस काय करारा जवाब देणार, खेडच्या सभेपूर्वी कुणी एकनाथ शिंदे यांना डिवचलं?