मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? अजित पवार यांना सवाल करताच अजितदादा भडकले अन् म्हणाले, ‘अरे कितीदा आता…’
VIDEO | मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न अजित पवार यांना पत्रकारानं केला असता अजितदादा काहीसे भडकले, पण नेमकं काय दिलं उत्तर?
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो, असे विधान नाना पटोले यांनी केले. नाना पटोले यांनी केलेले या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नाना पटोले यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते काम करत असतात प्रत्येकाला काही स्वप्न असतात, त्यामुळे त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे’. असे ते म्हणाले, तर यावेळी अजित पवार यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच अजित पवार काहिसे भडकल्याचे पाहायला मिळाले. पत्रकाराला उद्देशून म्हणाले, “अरे कितीदा, आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ का? ५० वेळा तेच-तेच चाललंय.”, असे त्यांनी म्हटले.