उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ‘तो’ प्रश्न विचारताच राज ठाकरे भडकले, अन् म्हणाले…

| Updated on: May 12, 2023 | 1:50 PM

VIDEO | मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे, असं राज ठाकरे का म्हणाले? बघा व्हिडीओ

ठाणे : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जसं मी माझ्या नैतिकतेली धरून राजीनामा दिला. तसंच बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आज राज ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारेने राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे, असं विचारलं असता, उद्धव ठाकरे यांचे काय प्रश्न आहे, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला त्यांचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे. माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका, असे राज ठाकरे म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला होता. आताही मुख्यमंत्र्यांना तोच सल्ला देणार का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले त्यामुळे हे सर्व घडलं आहे, असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावल्याचे पाहायला मिळाले.

Published on: May 12, 2023 01:50 PM
काकारे, मामारे करत रडण्यापेक्षा, अजित पवार यांनी अंधारेंना का फटकारलं? विचारलं कुठल्या पक्षाच्या?
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करण्यासाठी आहेत की सतरंज्या उचलायला? कुणी केला खोचक सवाल?