शरद पवार असं का म्हणताय, शहाण्याबद्दल विचारा; बघा TV9 चा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | कुणाबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले शहाण्याबद्दल विचारा, काय दिलं खोचक उत्तर, बघा TV9 चा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद म्हटली की ते कोणत्याही विचारलेल्या प्रश्नावर सविस्तरपणे उत्तर देतात. मात्र पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी उत्तर देणं टाळल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले शहाण्यांबद्दल विचारा, असे खोचक उत्तर दिले. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. बघा याबाबतचा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Mar 06, 2023 10:51 PM