नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? फडणवीस की शिंदे? भाजपच्या बड्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Nov 26, 2024 | 5:14 PM

दिल्ली हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली दिली आहे. तर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही यानंतर सुरू झाल्याची माहिती आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले....

शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर दाखल होत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. राज्यपालांनी तो राजीनामा स्विकारून तूर्तास एकनाथ शिंदेंवर काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. अशातच नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? फडणवीस की शिंदे? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना भाजपच्या बड्या नेत्यानं यावर भाष्य केले आहे. ‘भाजपाच कार्यकर्ता म्हणून भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझीही इच्छा आहे. पण हे आपला एका-दोघांच्या मतावर नसतं. तर सगळ्या आमदारांची मतं घेऊन आघाडीची नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर ते श्रेष्ठींकडे जातील आणि मुख्यमंत्री नेमका कोण होणार याचा निर्णय घेतील’, अशी स्पष्ट प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. दरम्यान, दिल्ली हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली दिली आहे. तर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही यानंतर सुरू झाल्याची माहिती आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, कोणीही नाराज नाही. महाराष्ट्रातील जनता खूश आहे. नाराज असण्याचं कारण काय? मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला महायुतीतील तिनही नेते एकत्र बसतील आणि ठरवतील. महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणालेत. तर येत्या ३० तारखेपर्यंत नव्या सरकारचा शपथ विधी पार पाडणार असल्याचेही दानवे यांनी म्हटले.

Published on: Nov 26, 2024 01:36 PM
Deepak Kesarkar : सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं… काय घडतंय?
Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण