मुख्यमंत्री तीन दिवस नेमके होते कुठे? विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी दिलं थेट प्रत्युत्तर, म्हणाले…

| Updated on: Apr 26, 2023 | 9:00 AM

VIDEO | मी कधीही सुट्टीवर जात नाही तर..., विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं थेट प्रत्युत्तर

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसाच्या सुट्टीवर गेलेत. मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे २४ ते २६ एप्रिलपर्यंत नेमके सुट्टीवर का गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस सुट्टीवर गेल्यानं विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्वतः विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांच्या आरोप-टीकांवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मी कधीही सुट्टीवर जात नाही तर मी डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये, असे म्हणत ठाकरे गटासह नाव न घेता उद्धव ठाकरे यांना देखील सुनावल्याचे पाहायला मिळाले. आता त्यांना घरी बसवलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय काही काम नसल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे.

बारसू रिफायनरीवरून ठाकरे गट आक्रमक, खासदार राऊत घेणार आंदोलनकर्त्यांची भेट
‘हुकमाचा एक्का अन् मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाचं पक्का, सासूरवाडीनंतर आता कुठं झळकले बॅनर्स