एकनाथ खडसे नेमके कुणीकडे? ना भाजपात प्रवेश झाला, ना राष्ट्रवादीने राजीनामा स्वीकारला?

| Updated on: Sep 23, 2024 | 10:50 AM

भाजप प्रवेशाला पूर्णविराम देत आपण राष्ट्रवादी कधी सोडलीच नव्हती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. यानंतर भाजपने एकनाथ खडसे यांनाच उत्तर दिलं आहे. खडसेंनी आता जिथे आहे तिथे सुखी राहण्याचा सल्ला अतुळ भातखळकरांनी दिलाय. तर ही लाचारी असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.

Follow us on

आपण राष्ट्रवादी सोडलीच नसल्याने भाजपाच अधिकृत प्रवेश झालाच नसल्याचा दावा करत एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जळगावात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खडसेंनी भाष्य केलं. यानंतर जिथे आहेत तिथे सुखाने नांदण्याचा सल्ला भाजपने एकनाथ खडसे यांना दिलाय. एकनाथ खडसे यांचा खरोखर भाजपाच प्रवेश झाला होता का? त्यांनी खरोखर राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता का? याबाबत एप्रिल महिन्यात एकनाथ खडसे म्हणाले होते की, भाजप हायकमांडसोबत प्रवेशाचं ठरल्यानंतर आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. मात्र प्रवेश होईपर्यंत राष्ट्रवादीने राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. त्यामुळे अधिकृतरित्या ना भाजपात प्रवेश झाला ना ही मी राष्ट्रवादी सोडली असा दावाच एकनाथ खडसे यांनी केला. साधारण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी खडसे यांनी भाजपात पुन्हा प्रवेश करणार असल्याची तयारी दर्शविली होती. मात्र हायकमांडने अद्याप आम्हाला कळवलं नसल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.