नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा विषय चर्चेत असताना मुक्ता वर्बे हिनं केलं ‘या’ नाट्यगृहाचं कौतुक

| Updated on: May 22, 2023 | 6:46 AM

VIDEO | राज्यातील काही नाट्यगृहांची अवस्था दयनीय असताना अभिनेत्री मुक्ता बर्वेकडून 'या' नाट्यगृहाची प्रशंसा, काय म्हणाली बघा...

मुंबई : राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा विषय सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता वैभव मांगले यांची यासंदर्भातील एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. यानंतर आता भरत जाधव यांनीदेखील रत्नागिरीमध्ये नाट्यगृहांबाबत दुरावस्था व्यक्त केली होती. मात्र अशातच अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तिने एका नाट्यगृहाची प्रशंसा केल्याचे दिसतंय. इतकंच नाही तर त्यामध्ये तिने कशाप्रकारे नाट्यगृह स्वच्छ होताय, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ज्या नाट्यगृहाचं मुक्ता बर्वे हिनं कौतुक केलं ते म्हणजे नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, काही काही नाट्यगृहाची अवस्था खूपच दयनीय आहे. मात्र नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह खूपच सुंदर असं आहे. हे महापालिकेचे नाट्यगृह असलं तरीदेखील अद्याप सुंदर असल्याचं तिने म्हटले आणि मुक्ता बर्वे हिने विष्णुदास भावे नाट्यगृहाची प्रशंसा केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: May 22, 2023 06:46 AM
सदाभाऊ खोत यांना पंतप्रधान करा, कुणी केली राष्ट्रपतींकडे मागणी?
Special Report | गाय कापली? काँग्रेस जिकंली, आशिष शेलार यांचा ‘तो’ दावा खरा की खोटा?