Special Report | 25 हजार कोटींचा आरोप असलेले अमोल काळे कोण आहेत?

| Updated on: Feb 17, 2022 | 10:19 PM

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाआयटीत 25 हजारांचा घोटाळा झाला होता, फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाआयटीत झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अमोल काळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाआयटीत 25 हजारांचा घोटाळा झाला होता, फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाआयटीत झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणातील अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी महाआयटी घोटाळ्याचा उल्लेख केल्याने अमोल काळे हे अचानक चर्चेत आले आहेत. अमोल काळे हे 43 वर्षाचे आहेत. ते नागपूरचे रहिवासी आहेत. नागपूरच्या अभ्यंकर नगरात त्यांचे दोन टोलेजंग बंगले आहेत. ते कन्स्ट्रक्शन आणि आयटी विभागाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं.

Published on: Feb 17, 2022 10:18 PM
Special Report | संजय राऊत, सुजित पाटकर यांच्यातील जमीन व्यवहार उघड
दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट आजपासून ऑनलाईन मिळणार