देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ज्याचं नाव घेतलं तो अनिल जयसिंघानी आहे तरी कोण?
VIDEO | अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणात अनिल जयसिंघानींच्या मुलाला पोलिसांनी उल्हानगरमधून घेतलं ताब्यात...पण कोण आहे हा अनिल जयसिंघानी...जाणून घ्या
मुंबई : अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचे विधानसभेतही उमटले. यानंतर या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या पत्नीने या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्य्मातून काम करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधी पैशाची ऑफर दिली. नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती गेल्या चार ते पाच वर्षापासून फरार आहे. पण कोण आहे हा अनिल जयसिंघांनी तुम्हाला माहितीये का? अनिल जयसिंघांनी हा उल्हासनगरमधला एक क्रिकेट बुकी असून त्यानं सुरूवातील सट्टेबाज म्हणून काम केलं. तर २०१० साली त्याला छोटा बुकी म्हणून ओळखलं गेलं. तर त्याच वर्षी दुसऱ्या एका बुकीची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. २०१० साली बेट घेताना फाईव्हस्टार हॉटेलमधून रंगेहात अटक झाली…जाणून घ्या त्याच्याबद्दल सविस्तर…