Know This : Tokyo Paralympics 2020 मध्ये Gold Medal मिळवणारी Avani Lekhara कोण?

| Updated on: Aug 30, 2021 | 3:29 PM

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं.

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली. अवनी लेखराने फायनलमध्ये 249.6 पॉईंट्स मिळवले. अवनीच्या या कामगिरीने पॅरालिम्पिक्समधील नवा रेकॉर्ड बनला आहे. अवनीला फायनलमध्ये चीनच्या नेमबाजाने जोरदार फाईट दिली. मात्र गोल्डन ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या अवनीने सुवर्ण पदक मिळवूनच मैदान सोडलं. चीनच्या झांगने 248.9 गुणांसह दुसरं स्थान मिळवत, रौप्य पदक पटकावलं.

अवनी लेखरा 11 वर्षांची होती तेव्हा तिचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आलं. अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे. तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं. त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली. अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचं प्रतिनिधित्व केलं.

Rajesh Tope | कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना निर्बंधात सूट नाही : राजेश टोपे
Nagpur | मी माणसांत देव मानतो, भाजप नेत्यांनीही माणसांची सेवा करावी- Vijay Wadettiwar