Devendra Fadnavis : महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ‘मी शर्यतीत….’

| Updated on: Nov 15, 2024 | 1:49 PM

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होईल? याची चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य केल्यानंतर महायुतीमध्ये गोंधळाचं वातावरण असल्याची चर्चा सुरु होती. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले होते. यानंतर देखील राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. अशातच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट म्हटलंय. मी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. भाजप प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजप संसदीय मंडळाचा असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्राा दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील मुख्यमंत्रीपदावर भूमिका स्पष्ट केली आहे. तर भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सल्ला घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची कोणतीही अट ठेवली नव्हती. पण आम्ही एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलंय. मी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतलेला पण सरकारमध्ये राहून प्रशासनावर देखरेख करू शकेन असं वाटलं.

Published on: Nov 15, 2024 01:49 PM
Devendra Fadnavis : ‘…म्हणून राष्ट्रपती राजवट लागली’, शरद पवारांचं नाव घेत देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis : ‘भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी…’, फडणवीस आक्रमक, ‘मविआ’वर हल्लाबोल