शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?
'पवारांच्या मनात तीन नावे आहेत. ती फडणवीस यांना माहीत आहे. म्हणजे पवार आणि फडणवीस यांच्यात संवाद आहे का. अजितदादा आणि शिंदे यांना अस्वस्थ केलं जात आहे. ते चिंतीत होतील. हा गुमराह करण्याचा प्रयत्न आहे. ',जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांच्या डोक्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी कॉन्क्लेव्ह’मध्ये महाराष्ट्राचा महासंकल्पात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली यावेळी त्यांनी असे म्हटले तर यावर जयंत पाटील यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात जयंत पाटील यांना शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील? असा सवाल केला असता ते म्हणाले, शरद पवार साहेब हे फार अनुभवी नेते आहेत. त्यांना आम्ही विचारण्याचा प्रश्न येत नाही. ठरवून मुख्यमंत्री होत नाही. वेळ असेल तेव्हा बसून ठरवतील. पवार आमचे नेते आहेत. त्यांचा निर्णय मान्य आहे. महाविकास आघाडी सत्तेत आणण्याचं आमचं ध्येय असल्याचे जयंत पाटील म्हणाले तर पवार साहेब असं म्हणाले की नाही, आमच्याकडे चेहरा नाही. ते म्हणाले, सर्व एकत्र बसून साधक बाधक चर्चा होईल. त्यांनी पहिल्यांदा जे मत व्यक्त केलं ते बरोबर आहे. कालही व्यक्त केलं तेही बरोबर आहे.