राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? उत्सुकता शिगेला असताना ‘रामगिरी’वर पुन्हा शिंदेंच्या नावाची लागली पाटी
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि हीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना नागपूरच्या 'रामगिरी' बंगल्यावरील पाटीतून नेमका राजकीय संकेत काय? याच्या उलट-सुलट चर्चा नागपूरसह राज्यभरात सुरू झाल्या होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. अशातच नागपूर येथे असणाऱ्या रामगिरी या शासकीय निवासस्थान असणाऱ्या बंगल्यावर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. रामगिरी बंगल्यावर लावण्यात आलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काढण्यात आली होती. मात्र टिव्ही ९ मराठीच्या बातमीनंतर त्याची दखल घेत पुन्हा एकदा ‘रामगिरी’ बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि हीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना नागपूरच्या ‘रामगिरी’ बंगल्यावरील पाटीतून नेमका राजकीय संकेत काय? याच्या उलट-सुलट चर्चा नागपूरसह राज्यभरात सुरू झाल्या होत्या. असं असताना रामगिरी बंगल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आल्याने सुरू असलेल्या चर्चांणा पूर्णविराम मिळाला आहे.