Salim Kutta : कोण आहेत सलीम कुत्ता? ज्याच्यासोबत आहे ठाकरे गटातील नेत्याचं कनेक्शन?

| Updated on: Dec 15, 2023 | 11:17 PM

मुंबईच्या 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता यांच्या पार्टीत त्यांच्या सोबत डान्स केल्याचा व्हिडीओ त्यांना दाखवला मात्र कोण आहे सलीम कुत्ता? सलीम कुत्ता याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असं आहे. मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्ता 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी

मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : विधानसभेत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नाशिकचे ठाकरे गटाचे नेते, सुधाकर बडगुजर यांचा एक फोटो आणि व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मुंबईच्या 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता यांच्या पार्टीत त्यांच्या सोबत डान्स केल्याचा व्हिडीओ त्यांना दाखवला मात्र कोण आहे सलीम कुत्ता? सलीम कुत्ता याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असं आहे. मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्ता 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे. कोर्टाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर सुप्रीम कोर्टाने 2013 साली ही शिक्षा वैध ठरवली. सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याची मोहम्मद शेथ उर्फ सलीम कुत्ताशी जवळीक आहे.

मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेवून शस्त्रसाठा पुरवल्याचा आरोप सलीम कुत्तावर आहे. गुजरातमधून हा शस्त्रसाठा जमा करुन तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता. हाच साठा स्फोटांसाठी वापरला गेला होता. सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेले RDX पुरवल्याचाबी आरोप आहे. बॉम्बस्फोटासाठी गुजरातमधून शस्त्रसाठा आणण्यात सलीम कुत्ताची भूमिका होती. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनसाठी सलीम कुत्ता काम करत होता. टायगर मेमन आणि जावेद चिकनानंच 1993च्या बॉम्बस्फोटाचा कट रचला होता.

Published on: Dec 15, 2023 11:17 PM
…तर तुमचा अन् आमचा विषय संपला, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला टोकाचा इशारा
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा आता हार्दिक पांड्याच्या खांद्यावर