राज्याचे उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? शिंदे की फडणवीस? संजय राऊत यांनी कुणाला केलं सिलेक्ट?

| Updated on: Mar 16, 2023 | 3:18 PM

VIDEO | महाराष्ट्रातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? असा सवाल संजय राऊत यांना विचारलं असता काय म्हणाले, बघा व्हिडीओ

मुंबई : शिवसेनेतील ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत केली आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाराष्ट्रात सत्तासंघर्षाला सुरूवात झाली. यादरम्यान देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री होणार असे सगळ्यांना वाटत होते. मात्र या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान, टीव्ही 9 च्या मुलाखतीत संजय राऊत यांना राज्यातील सर्वात उत्तम काम करणारे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला असता यावेळी दोन फोटो दाखवण्यात आले. यामध्ये एक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरा सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखवण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी एका क्षणाची विलंब न करता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखविला आहे.

Published on: Mar 16, 2023 03:18 PM
प्रसाद लाड प्रकरणावर शंभुराज देसाई यांनी दिलं ‘हे’ उत्तर
शेवटी सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण : संजय राऊत