Sanjay Shirsat : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? संजय शिरसाट यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव…’

| Updated on: Nov 26, 2024 | 4:03 PM

राजकीय वर्तुळात राजकीय नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू असून मुख्यमंत्रिपदासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशातच शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्रिपदावरून मोठी माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटले तरी अद्याप राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? किंवा नवं सरकार कधी स्थापन होणार? याचे उत्तरं समोर आलेल नाही. राजकीय वर्तुळात राजकीय नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू असून मुख्यमंत्रिपदासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशातच शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्रिपदावरून मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचंही नाव निश्चित झालेलं नाही, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. तर मुख्यमंत्रिपदासंदर्भात जो निर्णय होईल तो एकनाथ शिंदेंनाही मान्य असणार, असं म्हणत संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्रिपदावरून प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र एक प्रगतीशिल राज्य आहे. या राज्यातील मुख्यमंत्र्याच्या परिणाम देशाच्या राजकारणावर होतो. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची निवड आणि मुख्यमंत्रिपदाचा विचार करताना वेळ लागला तरी योग्य निवड करणं गरजेचं असतं. आता महायुतीत सर्व मुख्यमंत्रिपदासाठी लायक आहेत. त्यामुळे याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर सोडलं आहे. म्हणून त्यांचा निर्णय लवकर येईल’, असे संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Nov 26, 2024 04:02 PM
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? उत्सुकता शिगेला असताना ‘रामगिरी’वर पुन्हा शिंदेंच्या नावाची लागली पाटी
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी अन् EVM विरोधात रोष