महायुती अन् मविआला बंडखोर नेत्यांचं टेन्शन, विधानसभेच्या तोंडावर कोण-कोण बंडखोरीच्या तयारीत?

| Updated on: Oct 28, 2024 | 10:26 AM

महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर बंडखोरी करणाऱ्या नेत्यांचं चांगलंच टेन्शन आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्याकडून जागा वाटप जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी तिकीट न मिळालेल्या इच्छुक नेत्यानी बंडखोरी करण्याचा इशारा दिला.

Follow us on

पिंपरी चिंचवड विधानसभेत अजित पवार गटाचे नेते नाना काटे यांनी बंडखोरी करणार असल्याचा इशारा दिला. तर चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून राहुल कलाटे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान, चिंचवडची जागा भाजपला सुटल्याने नाना काटे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारी आहेत. शिरळा विधानसभेतही बंडखोरी होणार आहे. भाजपचे नेते सम्राट महाडिक बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. शिराळा विधानसभेत भाजपकडून सत्यजित देशमुख यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून मनसिंगराव नाईक हे रिंगणात आहेत. भाजपने सत्यजित देशमुख यांना तिकीट दिल्यानंतर सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, मुंबईच्या अणुशक्तीमध्ये शरद पवार गटात बंडखोरी करण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक या निवडणुकीच्या मैदानात आहेत तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकून निलेश भोसले यांना तिकीट न मिळाल्याने ते बंडखोरीच्या तयारीत आहेत.