मिटकरींना तुडवण्याची भाषा पण स्वतःच फरार, पोलिसांच्या अभयानं मनसे नेता कर्णबाळा दुनबळेंचा पत्ता नाही
अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे आणि अजित पवार गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. इतकंच नाहीतर तर अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ज्या कर्णबाळा दुनबळेंनी अमोल मिटकरींना तुडवण्याची भाषा केली होती पण...
मनसे आणि अजित पवार गटातील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हटल्यानंतर मनसेने मिटकरींची अकोल्यात गाडी फोडली होती. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे आणि अजित पवार गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. इतकंच नाहीतर तर अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ज्या कर्णबाळा दुनबळेंनी अमोल मिटकरींना तुडवण्याची भाषा केली होती ते कर्णबाळा दुनबळे दोन दिवसापासून गायब आहेत, अशी चर्चा सुरू आहे. तर पोलिसांच्या अभयामुळे मनसे नेता कर्णबाळा दुनबळे फरार असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरींच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर कर्णबाळा दुनबळेंना अकोल्यात येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान स्वीकारत अकोल्यात जात आहे असं सांगून दोन दिवसांपासून पत्ताच नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट