चंद्रपूरात काँग्रेसकडून लोकसभा कोण लढणार? बाळू धानोरकरांच्या पत्नी की वडेट्टीवारांची कन्या?
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कोण लढणार? दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर की विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार? या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचं नाव पुढे पण ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत
मुंबई, १३ मार्च २०२४ : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्या रस्सीखेचमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पक्षांतर्गत गटबाजीवरून गंभीर आरोप केले आहेत. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कोण लढणार? दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर की विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार? या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचं नाव पुढे आलं असून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. अशातच काँग्रेसमधून पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय. पक्षातील गटबाजीमुळेच आपल्या पतीचा जीव गेला असा गंभीर आरोप काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी केलाय. ‘खासदार साहेब गेलेत तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करीत आहेत. या विरोधामुळेच माझा पतीचा जीव त्यांनी घेतला. आता ते माझ्या मागे लागलेत. एक जीव गेला मात्र आता दुसरा जीव जाणार नाही. याची काळजी मी घेणार आहे,’ असे त्या म्हणाल्या.