बीड लोकसभा कोण लढवणार? यंदा भाजपचा उमेदवार बदलणार? प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात उतरणार?
२०१९ मध्ये बीड विधानसभा निवडणुकीची लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगली. मात्र २०२४ च्या बदललेल्या समीकरणांनी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू आहे. बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे मैदानात येणार का?
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : वेळ आली तर दुसऱ्या देशात जाऊन लढणार पण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभेच्या जागेवर लढणार नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुडे यांच्या भूमिकेत काहिसा बदल झाल्याची चर्चा आहे. तर यंदा बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचं नाव पुढे येतंय. २०१९ मध्ये बीड विधानसभा निवडणुकीची लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगली. मात्र २०२४ च्या बदललेल्या समीकरणांनी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू आहे. यापूर्वी आपण प्रीतम मुंडे यांची जागा घेऊन लढणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर महायुतीच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी प्रीतम मुंडे याच उमेदवार असतील असे संकेत दिलेत मात्र बीडमधून कोण लढणार हे वरिष्ठच ठरवतील असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे मैदानात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.